शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 02:29 PM2020-09-25T14:29:42+5:302020-09-25T14:30:49+5:30

ज्यावेळी सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी स्थगिती दिली त्यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते. अशी टीका माजीमंत्री विनोद तावडे यांनी नगर येथे केली.

Had Sharad Pawar abstained from food for reservation, the Maratha youth would have felt better; Criticism of Vinod Tawde | शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका

शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका

अहमदनगर : ज्यावेळी सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी स्थगिती दिली त्यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते. अशी टीका माजीमंत्री विनोद तावडे यांनी नगर येथे केली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात १८ हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यावरुन महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून आले, असेही तावडे म्हणाले. 

शरद पवार हे केंद्रात कृषिमंत्रीपद भोगले आहे. त्यांंना कृषी विधायकात काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. परंतु त्यांनी केवळ विरोधासाठी विरोेध केला. त्यांची ही भूमिका सामान्य शेतक-यांना पटलेली नाही. कृषिविधेयक नीट पाहिले तर शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणलेली आहे, असेही तावडे यावेळी म्हणाले.

Web Title: Had Sharad Pawar abstained from food for reservation, the Maratha youth would have felt better; Criticism of Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.