संगमनेरमधील पठारभागात गारपीट; नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच
By शेखर पानसरे | Published: March 18, 2023 04:50 PM2023-03-18T16:50:29+5:302023-03-18T16:50:44+5:30
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे
रामप्रसाद चांदघोडे
घारगाव (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात शनिवारी (दि. १८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारपीट सुरू झाली. साधारण पाऊण तास गारपीट सुरू होती. तालुक्याच्या साकुर फाटा, कजुले पठार, चंदनापुरी घाट परिसर आदी ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. पठार भागातील काही गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच पडलेला पहायला मिळाला. शेतात सगळीकडे गारा पडलेल्या दिसत होत्या. बोरांच्या आकाराच्या गारा पडत होत्या.
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेला शेतमाल खराब झाला आहे. टोमॅटो पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याचे पठार भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच पडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.