आधी श्रमदान, मग शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:29 PM2018-05-05T17:29:27+5:302018-05-05T17:40:12+5:30

मंडप सजला. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठ जमले. मिरवणूक निघायची वेळ झाली. अन् नवरदेव नवरीने मंडपातून येण्याऐवजी थेट माळरान गाठले. तिथं सुरू पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत दुष्काळमुक्तीसाठी आपलं योगदान दिलं. त्यांनी आधी श्रमदान केल्यानंतरच त्यांचं शुभमंगल सावधान झालं.

 Half Shramdan, then Shubhamangal careful | आधी श्रमदान, मग शुभमंगल सावधान

आधी श्रमदान, मग शुभमंगल सावधान

ठळक मुद्देपिंपळगाव वाघा रोड्या माळरानावर श्रमदाननववधू-वरांनी केले गावासाठी श्रमदान

केडगाव : मंडप सजला. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठ जमले. मिरवणूक निघायची वेळ झाली. अन् नवरदेव नवरीने मंडपातून येण्याऐवजी थेट माळरान गाठले. तिथं सुरू पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत दुष्काळमुक्तीसाठी आपलं योगदान दिलं. त्यांनी आधी श्रमदान केल्यानंतरच त्यांचं शुभमंगल सावधान झालं.
वॉटर कप स्पर्धेने अनेकांना वेड लावलंय. अशाच प्रकारे तुफान आलंया...म्हणत ८ एप्रिलपासून पिंपळगाव वाघा ग्रामस्थ गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी त्याग, दातृत्व व तळमळीतून एकजुटीने झपाटून श्रमदान करीत गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी धडपडत आहेत. यातून गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय मतभेद, हेवेदावे, वैयक्तिक भांडणे, श्रेयवाद बाजूला सारून एकत्र येण्याची सुवर्णसंधी गावकऱ्यांना मिळाली. आजघडीला गाव पाणीदार करण्यासाठी शेकडो हात सरसावलेले आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी व दुष्काळमुक्तीसाठी गावातील पाणी गावातच अडले पाहिजे, यासाठी १ मे या कामगारदिनी गावात महाश्रमदान यज्ञ करण्यात आला. त्यासाठी नगर व परिसरातील गावाच्या पंचक्रोशीतील हजारांवर जलमित्र सहभागी झालेले होते. महाश्रमदानात ग्रामस्थांबरोबरच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचलित पेस बांधकाम व प्लंबिंग ट्रेनिंग सेंटर, इलेक्ट्रिशियन ट्रेनिंग सेंटर, हेल्थकेअर ट्रेनिंग सेंटर, ब्युटी ट्रेनिंग सेंटर, स्नेहालय, आमी संघटना, एल अँड टी कंपनी, पुणेकर ग्रुप, मावळा ग्रुप, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर जलमित्र यावेळी श्रमदानासाठी उपस्थित होते.

रोड्या माळरानावर श्रमदान
याच दिवशी भाऊसाहेब येणारे यांचे चिरंजीव स्वप्निल यांचा विवाहसोहळा गावातीलच एकनाथ आंबेकर यांची कन्या राणी हिच्याशी पार पडला. विवाहमंडपातील सर्व विधी होण्यापूर्वी व डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी गावाशेजारील चास रस्त्यालगत असणा-या रोड्या नावाच्या माळरानावर श्रमदान सुरू असणा-या ठिकाणी जाऊन या नवदांपत्याने ग्रामस्थांबरोबर श्रमदान करीत सलग समतल चर खोदण्यासाठी योगदान दिले.

 

Web Title:  Half Shramdan, then Shubhamangal careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.