भुयारी मार्गाचा निम्मा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:54+5:302021-05-07T04:20:54+5:30
राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे यांनी महाराष्ट्र दिनी लोणी येथील पद्मश्री डॉ. ...
राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे यांनी महाराष्ट्र दिनी लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी, रेल्वे पोलीस, ठेकेदार यांनी वेळोवेळी चर्चा करून ५ मेपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते. रेल्वे इंजिनिअर विपुल सरीकर यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
यावेळी उपसरपंच बाळासाहेब पेरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शरदराव पेरणे, रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मंगल जैन, मोहन खाटेकर, युवा सेनेचे अविनाश पेरणे, विनित धसाळ आदी उपस्थित होते.