कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम अर्धवट; साईडपट्ट्या खोदल्याने अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:29 PM2019-11-17T14:29:11+5:302019-11-17T14:30:04+5:30

कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

Half of the welfare-free highway work; Sidebar excavations increased accidents | कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम अर्धवट; साईडपट्ट्या खोदल्याने अपघात वाढले

कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम अर्धवट; साईडपट्ट्या खोदल्याने अपघात वाढले

मतीन मणियार ।  
मढी : पाथर्डी तालुक्यातून जाणारा कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील तीन वर्षात अपघातांमुळे जवळपास पावणे दोनशे मृत्यू  झाले आहेत. तरीही महामार्ग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जमीन हस्तांतर होऊन २०१४ मध्ये कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी वेगात काम सुरू होते. पाथर्डी तालुक्यात हा महामार्ग करंजी घाट ते खरवंडी कासार असा ५० किलोमीटरचा आहे. १० मीटर रूंदी असणा-या रस्त्याचे काम जून २०१७ पूर्वीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, मागील पाच वर्षे कासवगतीने काम सुरू आहे. 
काही ठिकाणी पुलांचे रखडलेले रुंदीकरण काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खोदलेल्या तशाच आहेत. त्या ठिकाणी तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. 
मध्यंतरी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डी येथे महामार्ग प्रशासन व ठेकेदार संस्था यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. मात्र तरीही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यातही दुजाभाव दिसतो. काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे कामही अर्धवट सोडून दिल्याचे दिसते. 
या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, मढीचे बबन मरकड, चक्रधर ससाणे, गणेश कर्डिले, पिंटू परमार, शेकापचे तालुकाध्यक्ष संदीप अकोलकर यांनी केली आहे.
माझा एकुलता एक मुलगा या रस्त्यावरून रोज नगरला ये-जा करतो. रस्त्याची अवस्था बघता मुलगा सुखरूप घरी येईपर्यंत जीवाला काळजी लागलेली असते, असे करंजी येथील रहिवासी विमल अकोलकर यांनी सांगितले.


या कामाची ठेकेदार कंपनी आर. बी. के. ने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. लवकरच नियुक्त केलेला नवीन ठेकेदार काम सुरू करणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश जोशी यांनी सांगितले. 
 

Web Title: Half of the welfare-free highway work; Sidebar excavations increased accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.