कर्जतमधील पाटबंधारे वसाहत आवारातील अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 07:20 PM2018-05-25T19:20:51+5:302018-05-25T19:21:29+5:30
कर्जतमधील पाटबंधारे विभाग वसाहत आवारातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कर्जत : कर्जतमधील पाटबंधारे विभाग वसाहत आवारातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कर्जत येथील बेलेकर कॉलनी रोडलगत पाटबंधारे विभागाचे कार्यालय व वसाहत आहे. या वसाहतीत तार कंपाऊंडच्या आत गत आठवड्यात टपऱ्यांची अतिक्रमणे झाली होती. पाटबंधारे विभागाचे कर्जतचे उप विभागीय अधिकारी तुकाराम मचे यांनी ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही सुरू केली. वरिष्ठांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना देण्यात आले. शुक्रवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी तुकाराम मचे, शाखाधिकारी प्रकाश लोखंडे, दत्तात्रय मोरे, पांडुरंग बोरूडे यांनी तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांना घेतले. व पोलीस बंदोबस्तानंतर आवारातील अतिक्रमणे हटविण्यात आली. हीे अतिक्रमण हटविल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.