कुकाण्यात अखेर अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:26+5:302021-08-28T04:25:26+5:30

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील देवगाव चौक, तरवडी चौक, बसथांबा परिसर व जेऊरहैबती चौक ते हायस्कूलपर्यंतची दुतर्फा असलेल्या अतिक्रमणधारकांवर बांधकाम ...

Hammer on the encroachments at last in Kukana | कुकाण्यात अखेर अतिक्रमणांवर हातोडा

कुकाण्यात अखेर अतिक्रमणांवर हातोडा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील देवगाव चौक, तरवडी चौक, बसथांबा परिसर व जेऊरहैबती चौक ते हायस्कूलपर्यंतची दुतर्फा असलेल्या अतिक्रमणधारकांवर बांधकाम विभागाने ही कारवाई केली आहे. ही कारवाई करणार असल्याच्या नोटिसा संबंधितांना उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीने दीड महिन्यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. यापूर्वी सन २००० मध्ये ही अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, पुन्हा या ठिकाणी व्यावसायिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करीत मोठमोठे शेड व टपऱ्या उभारल्या होत्या. या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे बांधकाम विभागाने मोठी कारवाई करीत सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान उपअभियंता वाय. एस. कोकरे, शाखा अभियंता आर. ए. खामकर, स्थापत्य अभियंता रवींद्र ढाकणे यांनी दोन जेसीबी यंत्रासह येऊन ही धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते.

कुकाणा बसथांब्यापासून शेवगाव व नेवासा मार्गाच्या दिशेने अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईत जवळपास दोनशेहून अधिक अतिक्रमण काढून जमीनदोस्त करण्यात आली.

दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये सलून व्यवसायिक, पाववडा विक्रेते, चहा सेंटर व फळ विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. नेवासाफाटा ते कुकाणा - चिलेखनवाडी मार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरण कामास सुरुवात होणार असल्याने डांबरीकरणास अडथळा ठरणारी अतिक्रमणे रस्ता काम सुरू होण्यापूर्वीच हटविण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-------------

फोटो - पानावर

Web Title: Hammer on the encroachments at last in Kukana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.