नगर शहरातील अतिक्रमणांवर हातोडा; व्यापाराच्या आंदोलनानंतर महापालिकेकडून दखल

By अरुण वाघमोडे | Published: April 16, 2023 06:39 PM2023-04-16T18:39:15+5:302023-04-16T18:39:41+5:30

अतिक्रमण विरोधातील ही मोहिम अशीच कामय राहणार असल्याचे यावेळी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

Hammer on city encroachments; Notice from the Municipal Corporation after the trade agitation | नगर शहरातील अतिक्रमणांवर हातोडा; व्यापाराच्या आंदोलनानंतर महापालिकेकडून दखल

नगर शहरातील अतिक्रमणांवर हातोडा; व्यापाराच्या आंदोलनानंतर महापालिकेकडून दखल

अहमदनगर: महापालिकेने रविवारी  पोलिस बंदोबस्तात शहरातील कापड बाजारासह परिसरातील अतिक्रमण हटविले. अनधिकृत टपऱ्या, शेड, हातगाड्या, रस्त्यावरील ताडपत्र्या, दुकानांसमोरील स्टॅण्ड असे सर्व काही पथकाने काढून टाकत बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते मोकळे केले. 

अतिक्रमण विरोधातील ही मोहिम अशीच कामय राहणार असल्याचे यावेळी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी कापड बाजारातील व्यापाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर रविवारी व्यापारी असोसिएशनचे आक्रमक पवित्रा घेतला. कापड बाजारासह शहाजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार घास गल्ली आदी ठिकाणचे अतिक्रम काढून टाका, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. खासदार सुजय विखे यांनी व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शनिवारी तत्काळ महापालिकेच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला.

दरम्यान शनिवारी दुपारी पाऊस सुरू झाल्याने अतिक्रमण काढण्यास व्यत्यय आला होता. त्यामुळे मनपाचे पथकाने रविवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. कापड बाजारातील शहाजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार, घासगल्ली आदी परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. मनाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Hammer on city encroachments; Notice from the Municipal Corporation after the trade agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.