‘माउली’च्या मदतीला साईनगरीतून माणुसकीचा हात, लॉकडाऊनमुळे मदत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:19 PM2020-05-04T22:19:05+5:302020-05-04T22:21:06+5:30

शिर्डी : लॉकडाऊनमुळे मदत थांबल्याने अडचणीत आलेल्या शिंगवे (ता. नगर) येथील माउली प्रतिष्ठानला मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ सार्इंच्या नगरीतील अनेकांनी यात योगदान देऊन साईबाबांच्या शिकवणुकीचा व माणुसकी जीवंत असल्याचा परिचय दिला आहे़ नगर जवळील शिंगवे येथे डॉ़ राजेंद्र धामणे व डॉ़ सुचेता धामणे यांनी रस्त्यावर जगणाऱ्या बेवारस, मनोरूग्ण, व अत्याचार पीडित माता-भगिनींना आयुष्यभरासाठी माउली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवारा उपलब्ध करून दिला आहे़ या प्रकल्पात सध्या ३०२ माता-भगिनी व त्यांची येथेच जन्मलेली २८ बालके कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत़ 

The hand of humanity from Sainagari to help ‘Mauli’, the help stopped due to lockdown | ‘माउली’च्या मदतीला साईनगरीतून माणुसकीचा हात, लॉकडाऊनमुळे मदत थांबली

‘माउली’च्या मदतीला साईनगरीतून माणुसकीचा हात, लॉकडाऊनमुळे मदत थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : लॉकडाऊनमुळे मदत थांबल्याने अडचणीत आलेल्या शिंगवे (ता. नगर) येथील माउली प्रतिष्ठानला मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ सार्इंच्या नगरीतील अनेकांनी यात योगदान देऊन साईबाबांच्या शिकवणुकीचा व माणुसकी जीवंत असल्याचा परिचय दिला आहे़
नगर जवळील शिंगवे येथे डॉ़ राजेंद्र धामणे व डॉ़ सुचेता धामणे यांनी रस्त्यावर जगणाऱ्या बेवारस, मनोरूग्ण, व अत्याचार पीडित माता-भगिनींना आयुष्यभरासाठी माउली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवारा उपलब्ध करून दिला आहे़ या प्रकल्पात सध्या ३०२ माता-भगिनी व त्यांची येथेच जन्मलेली २८ बालके कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत़ 
सरकारी अनुदानाशिवाय केवळ दानशूरांच्या मदतीवर हा प्रकल्प सुरू आहे़ लॉकडाऊनमुळे देणगीदारांचा ओघ थांबल्याने धामणे दाम्पत्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहीला आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘माउलीला हवा मदतीचा हात’ या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली़ शिर्डीकरांनी याला तत्काळ प्रतिसाद देत मदत गोळा केली़
कैलास कोते, अर्चना उत्तमराव कोते, वत्सलाबाई गोविंद कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, बाळासाहेब लुटे, पुखराज लोढा, रतीलाल लोढा, नितीन शेळके, अरविंद कोते, दत्तात्रय गोविंद कोते, कमलाकर कोते, राजेंद्र कोते, राहुल गोंदकर, केतन कोते, मधुकर कोते, विकास गोंदकर, निखील बोरावके, सचिन जगताप, जितेंद्र गाढवे यांच्याकडून प्रत्येकी एक पोते गहू, सुजीत गोंदकर यांच्याकडून पाच, शिलधी प्रतिष्ठाण कडून सहा, सुनिल निकम व रमेश राऊत यांच्याकडून दोन, साईश्वरी सुनील वारूळे या लहानगीने आपला डबा फोडून पाच गोणी तांदूळ दिला़ अकोळनेरचे सुनील गारूडकर, पुण्याचे लक्ष्मण काकडे यांनी माउलीला थेट मदत पाठवली़ दादासाहेब जांभुळकर, रविंद्र कोते, विजय आप्पासाहेब कोते, तुषार शेळके, निलेश सावे, कुणाल आभाळे, लता रायरीकर, मुंबईचे प्रतिक जाधव, डॉ़ यशोधन पितांबरे, डॉ़ मैथिली पितांबरे, डॉ़ उज्वला काळे, डॉ़ सुशील सावंत, व कराडच्या कृष्णा सख्या गु्रप आदींकडून मिळालेल्या देणगीतून जवळपास सत्तावीस हजारांचा किराणा घेण्यात आला़ चेतन कदम व राजन शेंडगे यांनी अडीचशे किलो कांदा पाठवला़
-------
माउली अनाथ महिलांसाठी मायेचा वटवृक्ष आहे़ साईबाबांच्या शिकवणुकीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाने संकटसमयी या प्रकल्पाला मदत करायला हवी़
 कैलास कोते, माजी नगराध्यक्ष
-माउली मध्ये साईबाबांना अभिप्रेत असलेले कार्य सुरू आहे़ साईसंस्थान कडून कायमस्वरूपी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.
- अर्चना कोते, नगराध्यक्षा
------------
शिर्डीत जेव्हा निराधार व बेवारस महिला आढळतात तेव्हा आम्ही हक्काने त्यांना डॉ़ धामणे यांच्या माउलीच्या छायेत पाठवतो़ ‘लोकमत’ने माउलीच्या व्यथा समाजासमोर मांडून दानशूरांना योग्य ठिकाणी मदतीची संधी उपलब्ध करून दिली़
डॉ़ मैथिली पितांबरे

Web Title: The hand of humanity from Sainagari to help ‘Mauli’, the help stopped due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.