कोरोनात पती गमावलेल्या भगिनींना मायेचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:42+5:302021-08-24T04:25:42+5:30
कोतूळ : कोरोनाच्या महामारीत पती गमावलेल्या भगिनींच्या हस्ते रक्षाबंधन करून एक सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. वैभवराव पिचड विचार ...
कोतूळ : कोरोनाच्या महामारीत पती गमावलेल्या भगिनींच्या हस्ते रक्षाबंधन करून एक सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. वैभवराव पिचड विचार मंचाने थेट या बहिणींच्या घरी जाऊन राख्या बांधून घेतल्या. विधवा, निराधार, रोजगार अशा विविध योजनांचे अर्ज भरून घेत कायमची हक्काची ओवाळणी देण्याची जबाबदारी उचलली.
कोतूळ येथील सहा महिलांच्या घरी ही अनोखी भाऊबीज साजरी झाली. तसेच मुस्लीम बहिणींच्या हस्ते रक्षाबंधन करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. यावेळी मराठा महासंघाचे राजेंद्र गवांदे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, शंकर घोलप, नीलेश तळेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विकास देशमुख, सचिव गौरव बोनोटे, शहराध्यक्ष श्याम देशमुख, महिला आघाडीच्या रेश्मा गोडसे, विजय काळे, सचिन गिते, दीपक बोऱ्हाडे, अमोल गोडसे, अमोल कोते, मोहन खरात, नरेंद्र साळवे आदी उपस्थित होते.