करंदीत महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा
By Admin | Published: May 15, 2017 08:40 PM2017-05-15T20:40:48+5:302017-05-15T20:40:48+5:30
पारनेर तालुक्यातील करंदी येथे सोमवारी सकाळी महिलांनी पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
आॅनलाईन लोकमत
कान्हूर पठार (अहमदनगर), दि़ १५ - पारनेर तालुक्यातील करंदी येथे सोमवारी सकाळी महिलांनी पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
गावातील सर्वांनाच ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून तहसीलदार व पंचायत समिती प्रशासनास वेळोवेळी कळवूनही कोणीही दखल घेत नसल्याचे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले. यावेळी संगीता कांबळे, अनुपमा सोनावणे, सुनीता ठाणगे, कांचन आतकर, मीना आतकर, संजना ठाणगे, जोती उघडे, करूना उघडे, कौसबाई क्षीरसागर यांसह अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. मोर्चामधील महिलांनी दिलेले निवेदन सरपंच वैशाली उघडे यांनी स्वीकारून लगेचच ग्रामसेवक शेळके यांच्यामार्फत पंचायत समितीला पाठवण्याची कार्यवाही केली. पाण्याच्या अडचणीसंदर्भात वेळोवेळी सर्व समस्या आपण पंचायत समितीस कळवल्या असूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. आता जर दोन दिवसात गावाला पाणी मिळाले नाही तर स्वत: गावातील ग्रामस्थांसह कान्हूर पठार पारनेर या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येईल,असा इशारा सरपंच उघडे यांनी दिला.