मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:29+5:302021-04-13T04:20:29+5:30
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मूलबाळ होत नाही, स्वयंपाक येत नाही, घरात काम जमत नाही. लग्नावेळी खर्च झालेले ५० हजार ...
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मूलबाळ होत नाही, स्वयंपाक येत नाही, घरात काम जमत नाही. लग्नावेळी खर्च झालेले ५० हजार रुपये घेऊन यावे, यासाठी विवाहितेला तिच्या नवऱ्यासह सासूने लाथाबुक्क्यांनी, काठीने वारंवार मारहाण केली. तसेच गॅसवर उलतनी तापवून तोंडावर, ओठावर, पोटावर चटके देऊन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
ही घटना जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील पानकुरा येथे शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर, संबंधित महिलेने नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी हे तिचे माहेर गाठले. त्यानंतर पीडित महिला सविता हेमंत ठाकरे (वय २२, रा. पानकुरा, ता. भुसावळ, जि. जळगाव, हल्ली रा. सोनेवाडी, ता. कोपरगाव) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नवरा हेमंत रमेश ठाकरे, सासू लताबाई रमेश ठाकरे दोघे (रा. पानकुरा, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार महेश कुसारे यांनी अधिकचा तपास करून सदरचा गुन्हा भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.