घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

By रोहित टेके | Published: April 24, 2023 06:13 PM2023-04-24T18:13:51+5:302023-04-24T18:14:12+5:30

लग्न झाल्यापासून सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घरबांधन्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरीक व मानसीक छळ केला.

Harassment of a married woman demanding 25 lakhs for building a house | घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

कोपरगाव (अहमदनगर) : लग्न झाल्यापासून सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घरबांधन्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरीक व मानसीक छळ केला. तसेच तिला उपाशी पोटी ठेवुन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुजरात राज्यातील बडोदा येथे १४ मे २०२२ ते ९ नोव्हेंबर २०२२  दरम्यान वारंवार घडली.

 याप्रकरणी पीडित महिला श्रध्दा परेश ढोणे (वय ३३ वर्षे, रा. संजिवनी कारखाना कॉलीनी, शिंगणापुर, ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून पती परेश यशवंत ढोणे, सासरे यशवंत मारुती ढोणे, सासु चंपाताई यसवंत ढोणे, व दिर जितेश यशवंत ढोणे, (चौघे रा. भावका भवानी मंदिराजवळ गायत्री मंदिर परिसर चित्तळ रोड, अमरेली, गुजरात, ता. जि. अमरेली) व ननंद हेतल अमित देवकाते (रा. बडोदा ता. जि. बडोदा. रा.गुजरात.) या पाच जणांविरुद्ध सोमवारी (दि.२४) दुपारी चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड करीत आहेत.
 

Web Title: Harassment of a married woman demanding 25 lakhs for building a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.