हातभट्टी चालकांची गलोरीने ग्रामस्थांवर दगडफेक; पोलीस पाटलांसह दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 02:40 PM2020-05-13T14:40:06+5:302020-05-13T14:43:58+5:30

संगमनेर तालुक्यातील निमज येथील विद्यानगर परिसरातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणा-या विहिरीची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर गावठी दारू बनविणा-या हातभट्टी चालकांनी गलोरीने दगडफेक केली. यात पोलीस पाटलांसह दोन ग्रामस्थ जखमी झाले आहेत.

Hatbhatti drivers proudly throw stones at villagers; Two injured, including police patrol | हातभट्टी चालकांची गलोरीने ग्रामस्थांवर दगडफेक; पोलीस पाटलांसह दोघे जखमी

हातभट्टी चालकांची गलोरीने ग्रामस्थांवर दगडफेक; पोलीस पाटलांसह दोघे जखमी

संगमनेर : तालुक्यातील निमज येथील विद्यानगर परिसरातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणाºया विहिरीची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर गावठी दारू बनविणा-या हातभट्टी चालकांनी गलोरीने दगडफेक केली. यात पोलीस पाटलांसह दोन ग्रामस्थ जखमी झाले आहेत. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
सागर सोमनाथ बर्डे (रा.कासारा दुमाला, ता.संगमनेर), नवनाथ लक्ष्मण माळी (रा.निमज शिवार, ता.संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात रवींद्र अशोक माने (रा.विद्यानगर, निमज, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली. निमज गावातील विद्यानगर परिसराला प्रवरा नदीच्या कडेला असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी (१२ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास रवींद्र माने व त्यांचे चुलत भाऊ विशाल राजू माने हे दोघे या विहिरीची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे सागर बर्डे, नवनाथ माळी व इतर लोक आडोशाला बसलेले होते. त्यांनी या दोघांना पाहताच त्यांच्यावर गलोरीने दगडफेक सुरू केली. यात ते दोघेही जखमी झाले. त्यांनी तेथून निघून जात याबाबत निमज गावचे पोलीस पाटील निलेश मोहन साळुंके यांना कळविले. ते काही ग्रामस्थांसह तेथे गेले असता पुन्हा गलोरीने दगडफेक सुरू झाल्याने साळुंके हे देखील जखमी झाले.  दगडफेकीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तपास सहायक  फौजदार घोडे करीत आहेत. 
पोलिसांनी केला दारू अड्डा उद्ध्वस्त
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार बाळासाहेब घोडे, अनिल मोरे, पोलीस हेड कॉँस्टेबल म्हतारबा जाधव, परमेश्वर गायकवाड, पोलीस नाईक अनिल जाधव, यमना जाधव हे नदीच्या काठी गेले असता पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांना तेथे असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, १५ लीटरचे २५ डब्बे गावठी दारू असा ९ हजार ३७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Web Title: Hatbhatti drivers proudly throw stones at villagers; Two injured, including police patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.