हौसेला मोल नाही.. चॉईस नंबरसाठी मोजले सव्वादोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:25+5:302021-07-01T04:15:25+5:30

-------------- सर्वाधिक पसंती या क्रमांकांना नगर जिल्ह्यात ९, ९९, ९९९,९००९ या क्रमांक मालिकेला दरवर्षी मोठी मागणी असते, तसेच १, ...

Hausa is not worth .. Twelve crores counted for choice number | हौसेला मोल नाही.. चॉईस नंबरसाठी मोजले सव्वादोन कोटी

हौसेला मोल नाही.. चॉईस नंबरसाठी मोजले सव्वादोन कोटी

--------------

सर्वाधिक पसंती या क्रमांकांना

नगर जिल्ह्यात ९, ९९, ९९९,९००९ या क्रमांक मालिकेला दरवर्षी मोठी मागणी असते, तसेच १, १६,०००२, ३०० हे क्रमांकही मोठ्या प्रमाणात घेतले जातात. एखाद्या क्रमांकाला एकापेक्षा जास्त जणांनी मागणी केलेली असेल तर ज्याने जास्त पैशांचा धनादेश दिलेला आहे त्याला तो क्रमांक दिला जातो. ज्या वाहनचालकांचे बजेट कमी असते त्यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंतही पसंती क्रमांकांची मालिका उपलब्ध आहे.

-----------------

इतका मिळाला महसूल

पसंती क्रमांकाच्या माध्यमातून १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षांत २ हजार ४८७ वाहनधारकांनी पसंती क्रमांक घेतले. या माध्यमातून २ कोटी २४ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल मिळाला. तर एप्रिल ते मे २०२१ या दोन महिन्यांत १७७ वाहनधारकांनी पसंती क्रमांक घेतला. या माध्यमातून १३ लाख २० हजार रुपयांचा महसूल मिळाला.

-------------------

कोरोनाकाळातही पसंती क्रमांकाच्या माध्यमातून शासनाला चांगला महसूल मिळाला आहे. दुचाकी व चारचाकी संवर्गातील नवीन सिरिजमध्ये गणले जाणारे पसंती क्रमांक वाहनधारकांसाठी उपलब्ध असतात. वाहनचालक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमाप्रमाणे शुल्क भरून पसंती क्रमांक घेऊ शकतात. यासंर्दभात प्रसिद्धी पत्रक काढले जाते. त्यात सर्व प्रक्रिया समजावून सांगितलेेली असते. तसेच कार्यालयातील कर्मचारीही मार्गदर्शन करतात.

- दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर.

Web Title: Hausa is not worth .. Twelve crores counted for choice number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.