स्वच्छतेचा मंत्र जनमाणसात रुजवून नवा आदर्श निर्माण केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:07+5:302021-07-31T04:22:07+5:30
जनशिक्षण संस्थान, अहमदनगरच्या वतीने १५ ते ३० जुलै दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप चंदनापुरी ...
जनशिक्षण संस्थान, अहमदनगरच्या वतीने १५ ते ३० जुलै दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप चंदनापुरी घाटातील डॉ. आर. एस. गुंजाळ इन्स्टिट्यूटस येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. गुंजाळ बोलत होते. संस्थेचे सहसचिव तथा जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष राहुल गुंजाळ, एबीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयसिंग लामटूळे, जनशिक्षणचे संचालक बाळासाहेब पवार, कमल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
गुंजाळ म्हणाले, शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रौढांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाची सुविधा जनशिक्षण संस्थान उपलब्ध करून देते. ही सुविधा घराजवळ उपलब्ध झाल्याने अनेक महिला आणि पुरुष रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेऊन आपल्या जीवनात स्वावलंबी बनले आहेत. प्रास्ताविक संचालक पवार यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार संस्थेचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ गुंजाळ मानले.