राज्य सरकारमध्ये कोण निर्णय घेतेय ते त्यांचे त्यांनाच कळत नाही- रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:54 PM2020-06-13T15:54:50+5:302020-06-13T15:54:59+5:30
अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
अहमदनगर : तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेते. हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनापुढे आता हात टेकले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
अहमदनगरमध्ये दानवे हे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, करोनाची स्थिती राज्यात चिंताजनक आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात पूर्वी एक रुग्ण जरी सापडला तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जात होते. त्याच्या कुटुंबालाही तात्काळ क्वारंटाइन केले जात होते. इतकेच नव्हे तर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन करण्याच्या हालचाली व्हायच्या. आता चित्र वेगळे आहे. आता रुग्ण सापडला तर फक्त रुग्णाला उपचारासाठी नेले जाते किंवा घरातच क्वारंटाइन केले जाते. हे जे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आवश्यक तेवढी काळजी घेतली जात नाही. सरकारने कोरोनापुढे हात टेकलेत.
--------
सरकारमध्ये समन्वयाचा अभाव
काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, असं खुद्द काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच सांगितले आहे. याचा अर्थच सरकारमध्ये समन्वय नाही असा निघतो,' असे दानवे म्हणाले.
-
तर ते कोविड विद्यार्थी ठरतील
अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायला हव्यात. अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर 'कोविड विद्यार्थी' असा कायमचा शिक्का बसेल,' अशी भीती दानवे यांनी व्यक्त केली.
अन्नधान्याची टंचाई भासणार नाही!
कोविडचं संकट किती काळ राहील हे आता सांगता येणार नाही. पण अर्थचक्रला गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजगार निर्माण करून देणाºया कंपन्या हळूहळू सुरू होत आहेत. देशात सध्या दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा असून भविष्यात अन्नधान्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही,असे दानवे यांनी स्पष्ट केले.