अमरापूर-पाथर्डी रस्त्यावरील ‘ते’ खड्डे बुजविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:51+5:302021-06-17T04:15:51+5:30

शेवगाव : ‘नुकताच पूर्ण झालेला राज्यमार्ग अवघ्या काही दिवसांत उखडला’ या आशयाचे वृत्त ९ जानेवारीला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ठेकेदाराने ...

He filled the potholes on Amarpur-Pathardi road | अमरापूर-पाथर्डी रस्त्यावरील ‘ते’ खड्डे बुजविले

अमरापूर-पाथर्डी रस्त्यावरील ‘ते’ खड्डे बुजविले

शेवगाव : ‘नुकताच पूर्ण झालेला राज्यमार्ग अवघ्या काही दिवसांत उखडला’ या आशयाचे वृत्त ९ जानेवारीला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ठेकेदाराने तत्काळ दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.

पाथर्डी ते अमरापूर दरम्यानच्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. तोच शेवगाव तालुक्यातील अमरापूर तर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ अवघ्या काही दिवसात रस्ता उखडला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने साकारण्यात आलेल्या बारामती ते अमरापूर राज्यमार्ग क्र.५४ चे हरकती असलेल्या काही ठिकाणचा अपवाद वगळता, अन्य रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आगामी काळात अमरापूर ते औरंगाबाद दरम्यानच्या रस्त्याचे काम होऊन बारामती व औरंगाबादला जोडणारा राज्यमार्ग, भिगवण, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, पैठण आदी शहरांच्या विकासात भर घालणारा ठरणार आहे. तसेच या मार्गावर येणाऱ्या शहरासाठी व गावांसाठी वरदान ठरत आहे.

पाथर्डी ते शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावापर्यंत राज्यमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. चकाचक दिसणाऱ्या या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावू लागली आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. या मार्गावर गाव तिथे लक्षवेधी बसथांबेही उभारण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत.

अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या या मार्गावर शेवगाव तालुक्यातील अमरापूर ते काळेवाडी तर पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी ते खेर्डा फाटा दरम्यान काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. काही ठिकाणी डागडुजी करण्यात आल्याचे दिसते. अचानक समोर दिसणारा खड्डा चुकविताना वाहनांना अपघात होण्याचा धोका वाढला होता. दरम्यान संबंधित ठेकेदाराने ‘ते’ खड्डे बुजविले आहेत.

---

१६ शेवगाव न्यूज

Web Title: He filled the potholes on Amarpur-Pathardi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.