अस्वस्थ वाटताच क्वाटंराईन सेंटर गाठले, इतराच्या संपर्कात न येण्याची घेतली काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:40 PM2020-06-16T20:40:39+5:302020-06-16T21:32:34+5:30
दहिगावने : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.
नानासाहेब चेडे
दहिगावने : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.
कोरोना बाधित व्यक्ती एस.टी. महामंडळात चालक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळात आपल्या घरी भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथेच ते राहत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच त्यांना कर्तव्यावर मुंबई येथे हजर होण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यामुळे ते आपल्या कर्तव्यावर हजर झाले. पुन्हा सुट्टी असल्याने ते १३ जूनला गावी परतले. आल्याबरोबर कोणाच्याही संपर्कात न येता ते विलगीकरण कक्षात दाखल झाले. मात्र येथे येताच काही तासांतच त्यांना काहीसा त्रास जाणवू लागला. दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर तात्काळ पुढील तपासणीसाठी नगर येथे हलवले. १६ जूनला त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
--------
मुंबईहून (कुर्ला) भावीनिमगाव येथे आलेली व्यक्ती थेट गावातील विलगिकरण कक्षात दाखल झाली होती. तेथून काही तासांतच त्यांना पुन्हा नगर येथे कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांना सोबत म्हणून रुग्णवाहिकेत त्यांचा भाऊ व आणखी एकजण असे दोघे गेले होते ते ही सिव्हिल हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यामुळे गावातील इतर कोणाशीही त्यांचा संपर्क आलेला नाही.
-चंद्रकांत जोशी, ग्रामविकास अधिकारी भावीनिमगाव
---------
कोरोना बाधित व्यक्तीचा गावातील कोणाशीही संपर्क आलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे, मात्र गाव संपूर्ण लॉकडाऊन करायचे की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
-मयुर बेरड, नायब तहसीलदार, शेवगाव