मुख्याध्यापक भास्कराचार्य तर शिक्षक रामानुजन पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:23+5:302021-02-16T04:21:23+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना भास्कराचार्य व इतर चार शिक्षकांना रामानुजन पुरस्काराने ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना भास्कराचार्य व इतर चार शिक्षकांना रामानुजन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. गणित विषयाबाबतीत विद्यार्थीहित जोपासून मार्गदर्शन केल्याने जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांसाठी विशेष मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी केले. यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत कृष्णराव लबडे यांना गणिततज्ज्ञ भास्कराचार्य पुरस्कार देण्यात आला. उपाध्यापक किरण दिगंबर बैरागी, अरुण सुखदेव पठाडे, उपाध्यापिका अंजली तुकाराम चव्हाण, मेनका विठ्ठल ढाकणे यांना गणिततज्ज्ञ रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी गणित अध्यापक मंडळाचे जिल्हा सहसचिव प्रा. प्रमोद कातकडे, शालेय समिती सदस्य सदानंद गायकवाड, मेजर संतोष मासाळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील काशिद, दीपक तागडे आदींसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
पाच पासपोर्ट फोटो
१५ चंद्रकांत लबडे, किरण बैरागी, अरुण पठाडे, अंजली चव्हाण, मेनका ढाकणे.