एमआयडीसीत स्थलांतरित कामगारांची आरोग्य तपासणी
By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:01+5:302020-12-05T04:34:01+5:30
जागतिक एड्स दिन साजरा होत असताना अशिक्षित घटक असलेल्या स्थलांतरित कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
जागतिक एड्स दिन साजरा होत असताना अशिक्षित घटक असलेल्या स्थलांतरित कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांसाठी अमृतदीप प्रकल्प राबविला जात असून या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १०३ स्थलांतरित कामगारांची आरोग्य तपासणी करून उपस्थित कामगारांना गुप्तरोग व एड्सबद्दल माहिती देऊन हे आजार टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
आजही एचआयव्हीबांधितांकडे तिरस्काराने पाहिले जाते. एड्स आजार टाळण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. काही कारणांनी एड्सची लागण होत असली तरी या रोगाने ग्रस्त असलेला व्यक्ती समाजाचा एक घटक आहे. या भावनेने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याची भावना जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे ए.आर.टी. विभाग प्रमुख डॉ. पानसंबळ, आसीटीसीचे समुपदेशक राहुल कडूस, डॉ. आरती आळकुटे आदी उपस्थित होते. आश्रय संस्थेचे सोमनाथ बर्डे, अजय दळवी, स्वप्निल मधे, कृष्णा बर्डे या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर केले. व्यवस्थापक राजू पाटोळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृतदीप प्रकल्पाचे समुपदेशक पल्लवी तुपे, लेखाधिकारी श्रीकांत शिरसाठ, क्षेत्रीय अधिकारी विकास बर्डे, मच्छिंद्र दुधवडे, ऋतिक बर्डे, अनिल दुधवडे यांनी परिश्रम घेतले.
------फोटो - ०२ कामगार तपासणी
जागतिक एड्स दिनानिमित्त एमआयडीसी परिसरात पथनाट्य घेऊन स्थलांतरित कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करून कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.