कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:21+5:302021-05-08T04:21:21+5:30
अहमदनगर : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांची आरोग्य समिती स्थापन केली असून, समितीच्या ...
अहमदनगर : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांची आरोग्य समिती स्थापन केली असून, समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेत सर्वपक्षीय आजी- माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुढील धोका ओळखून तातडीने उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य समिती स्थापना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. महापौर वाकळे यांच्यासह विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती आरोग्य समितीचे पदसिद्ध सदस्य असतील. ही समिती काेरोनाच्या संकट काळात ऑक्सिजन बेड, कोरोनावरील लसीकरण, कोविड केअर सेंटर, रुग्णालयांकडून आकारण्यात येणारी बिले यासह आरोग्य सुविधांबाबत निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करणार आहे. यामुळे आरोग्य सुविधांबाबत येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे यावेळी वाकळे म्हणाले.
...
हे आहेत समितीचे सदस्य
-निखिल वारे, माजी नगरसेवक (काँग्रेस)
-संजय ढोणे, सामाजिक कार्यकर्ते (भाजप)
-सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते (भाजप)
-सचिन शिंदे, नगरसेवक (शिवसेना )
-विपुल शेटीया, नगरसेवक (राष्ट्रवादी काँग्रेस)
-सचिन जाधव, माजी नगरसेवक (बसपा)