श्रीगोंद्यात ३५२ नागरिक शाळांमध्ये क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:34 PM2020-05-03T12:34:44+5:302020-05-03T12:35:17+5:30
गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्याबाहेरून ३५२ नागरिक आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या नागरिकांना १४ दिवसासाठी गावोगावच्या शाळांमध्ये क्वारंटाईन करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
श्रीगोंदा : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्याबाहेरून ३५२ नागरिक आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या नागरिकांना १४ दिवसासाठी गावोगावच्या शाळांमध्ये क्वारंटाईन करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील ३० नागरिकांची कोरोना संशयीत म्हणून तपासणी करण्यात आली. पण सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पण दौड तालुक्यात कोरोना पॉझीटिव्हचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु व गार या दोन गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. ही गावे १४ दिवस बंद करण्यात आली आहेत.
कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या साहाय्याने आरोग्य विभागाने बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना शाळांमध्ये क्वारंटाइन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आणखी आठ दिवसात बाहेरून आणखी नागरिक येणार आहेत. त्यामुळे गावगावच्या शाळांमध्ये क्वारंटाइन नागरिकांची संख्या वाढणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आता बाहेरुन येणाºया नागरिकांना कुंटुब आणि गावाच्या दृष्टीने शाळांमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे श्रीगोंदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले.