तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:52 PM2020-09-30T16:52:41+5:302020-09-30T16:53:47+5:30

अहमदनगर : सध्याच्या काळात हृदयविकाराचीे अनेक कारण आहेत.  उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, अनुवंशिकता, टाइप ए पर्सनॅलिटी, तणाव, चिंता, नैराश्य, व्यायामाचा अभाव ही कारणे आहेत. धावपळीच्या युगात तरुण आणि वृध्दांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना केल्या तर हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो, असे मत हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुदाम जरे यांनी व्यक्त केले.

Heart disease is the leading cause of death in young and old | तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण

तरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण

जागतिक हृदय आरोग्य दिन विशेष

हृदयविकार म्हणजे काय?

हृदयाला प्राणवायुमुक्त रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांना धमणी म्हणतात. (करोनरी आरटरी) मनुष्याचे वय जसे वाढते व ज्यांना कार्डियॅक रिस्क फॅक्टर आहेत. त्यांच्या हृदयाच्या धमणीमध्ये चरबीचा थर जमा होतो. (अ‍ॅथरोक्सिरॉसीस) त्यामुळे धमणी चिंचोळी होते व हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. ह्या चरबीच्या थराला जखम झाल्यास रक्ताची गुठळी तयार होते. हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. हृदयाचे स्नायू मृत पावतात व हृदयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात.

रिस्क फॅक्टर काय आहे?
 उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, अनुवंशिकता, टाइप ए पर्सनॅलिटी, तणाव, चिंता, नैराश्य, व्यायामाचा अभाव.

हृदयविकाराची लक्षणे कोणती आहेत?
हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला छातीत आणि पाठीत कळ येऊन ती डावा खांदा, हात व मानेकडे जाते. पूर्ण शरीराला दरदरून घाम फुटतो. मळमळ व उलटी होते. काही जणांना गळा आवळल्यासारखे वाटते. श्वास घेण्यास त्रास होतो. काही जण चक्कर येऊन बेशुद्ध होतात. उपचार - ५० टक्के मृत्यू हे रुग्णालयात पोहचण्यापूर्वी होतात. ई.सी.जी. व टु डी इको केल्यानंतर पुढच्या उपचाराचा निर्णय घेतला जातो. अ‍ॅस्पिरिनची गोळी दिली जाते. 

आधुनिक उपचार पध्दती कोणती?
 प्रायमरी अ‍ॅन्जिओप्लास्टी : रुग्णाला कॅथलॅब सूट मध्ये घेऊन हाताच्या किंवा पायाच्या शिरेतून कॅथेटरच्या सहाय्याने हृदयाच्या धमणीमध्ये डाय (कॉन्ट्रास्ट) सोडले जाते व फोटो काढतात. (करोनरी अ‍ॅन्जिओग्राफी) धमणीतील रक्ताच्या गुठळ्या काढून तिथे स्टेंट बसवतात. (करोनरी अ‍ॅन्जिओप्लास्टी) व हृदयाचा खंडित झालेला रक्तपुरवठा सुरळीत चालू होतो. जे रूग्ण दूर आहेत. व ज्यांना ९० मिनिटांमध्ये कॅथ लॅबपर्यंत पोहचणे अशक्य आहे त्यांना रक्ताची गुठळी वितळण्याचे इंजेक्शन दिले जाते (थ्रंबोलिमीस)

हृदयविकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
जीवनशैलीत बदल : समतोल आहार घ्यावा. आहारात चरबी व मीठाचे प्रमाण कमी आणि फायबर व जटील कार्बोदके यांचे प्रमाण जास्त असावे. हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे खावीत. दररोज ३०-४० मिनिटे घाम येईपर्यंत शारीरिक व्यायाम करावा. (चालणे, पोहणे, सायकल चालवणे). मानसिक स्वास्थ्य स्थिर असावे. (योगा, मेडिटेशन) पोटाचा घेर कमी करावा. धूम्रपान करू नये व करत असल्यास बंद करावे. उच्च रक्तदाब, मधुमेह व उच्च कोलेस्टेटॉल असणाºयांनी नियमित तपासणी करून औषधे घ्यावीत.

-डॉ. सुदाम जरे, हृदयविकार तज्ज्ञ, डायरेक्टर कॅथ लॅब मॅककेअर हॉस्पिटल, सावेडी, अहमदनगर.

Web Title: Heart disease is the leading cause of death in young and old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.