हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:45 AM2024-12-02T10:45:23+5:302024-12-02T10:45:36+5:30

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

Heartbreaking Farmer dies after getting stuck in rotavator | हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

अहिल्यानगर : रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे घडली. दिलीप आण्णासाहेब कहांडळ (वय ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप कहांडळ हे रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास कांदा लागणीसाठी रोटावेटरने शेत जमीन तयार करीत होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य ट्रॅक्टर चालवित होते. यावेळी रोटावेटरमध्ये पॅण्ट अडकल्याने दिलीप कहांडळ यांचा पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. ट्रॅक्टर बंद करेपर्यंत मांडीपर्यंत पाय रोटावेटरमध्ये ओढला गेला. गंभीर जखमी अवस्थेत नातेवाइकांनी श्रीरामपूर येथे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित केले. कहांडळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

दरम्यान, अशोक साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाऊसाहेब कहांडळ व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय कहांडळ यांचे ते बंधू होत.

Web Title: Heartbreaking Farmer dies after getting stuck in rotavator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.