अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात : बीड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकासह पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 03:33 PM2019-02-28T15:33:04+5:302019-02-28T15:33:48+5:30

नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता.श्रीगोंदा) शिवारात झालेल्या अपघातामध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता जाधव यांचा दुर्देवी अंत झाला.

Heavy accident on Ahmednagar-Pune highway: Police officer in Beed district killed his wife | अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात : बीड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकासह पत्नी ठार

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात : बीड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकासह पत्नी ठार

श्रीगोंदा : नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता.श्रीगोंदा) शिवारात झालेल्या अपघातामध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता जाधव यांचा दुर्देवी अंत झाला. ही दुर्देवी घटना आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झाली. अनिल कुमार व सुजाता दोघे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्याला चालले होते.
अनिलकुमार व सुजाता यांची ऐश्वर्या नावाची मुलगी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. ऐश्वर्याचा आज (२८ फेब्रुवारी) रोजी वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह (एम.एच.-१०, ८८८९) या कारमधून पुण्याला जात होते. कारवरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून कार समोरून येणा-या भरधाव वेगातील कंटेनरवर जाऊन आदळली. नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणेवाडी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अनिल कुमार जाधव हे स्वत:कार चालवित होते. हा अपघात झाल्याची माहिती समजताच, परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली व अपघातग्रस्त दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असतानाच सुजाता यांचा मृत्यू झाला. तर अनिलकुमार जाधव यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब शिंदे करीत आहेत

Web Title: Heavy accident on Ahmednagar-Pune highway: Police officer in Beed district killed his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.