नगर शहर परिसराला जोरदार पावसाने झोडपले; चिचोंडीपाटील परिसरातही पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 04:38 PM2020-07-22T16:38:43+5:302020-07-22T16:39:22+5:30
नगर शहरासह परिसरात बुधवारी (२२ जुलै) चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.
अहमदनगर : नगर शहरासह परिसरात बुधवारी (२२ जुलै) चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.
गेल्या दोन दिवसापासून वातावरणात उष्णता होती. ढगाळ वातावरण होते. मंगळवारी रात्री नगर तालुक्यातील चिचोंडीपाटील, आठवड, सारोळा परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील ओढ्या नाल्यांना पाणी आले होते. संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा येथेही मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाला. हा पाऊस खरिपाच्या पिकांना पोषक आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारपासून नगर शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. परिसरातील ओढ्या नाल्यांना पाणी आले होते.