सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:58+5:302021-07-31T04:21:58+5:30
पाचेगाव : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होणार आहे. हवामान अंदाजाचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतातील पिकाचे नियोजन करावे. सप्टेंबर आणि ...
पाचेगाव : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होणार आहे. हवामान अंदाजाचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतातील पिकाचे नियोजन करावे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे काढणीच्या काळात शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले.
डख यांनी नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव आणि पाचेगाव येथे बुधवारी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामानविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर डख, अमरदीप शेरकर, वेदांत डख, कृष्णा मोरे हेदेखील उपस्थित होते.
बेलपिंपळगाव येथील श्रीराम मंदिर सभामंडपात त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी हवामानविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब तऱ्हाळ होते. पंचायत समितीचे सभापती किशोर जोजार प्रमुख पाहुणे होते.
पाचेगाव येथील गहिनीनाथ महाराज सभामंडपात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र शेरकर, चंद्रशेखर गटकळ, उपसरपंच बंडू चौगुले, तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे, हनुमान पतसंस्थेचे अध्यक्ष कल्याण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे, राजेंद्र गायकवाड, कार्लस साठे, वसंत रोटे, राजेंद्र साठे, पोलीस पाटील रंगनाथ पवार, अशोकराव नांदे, वामनराव तुवर, प्रभाकर शिंदे, शिवाजी कांबळे, माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य वामन तुवर, गफूरभाई शेख, पत्रकार अशोक तुवर, सुधाकर शिंदे, संपत मांजरे, रंगनाथ आढाव, पुंजाभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.
----
300721\img_20210728_144013.jpg
पाचेगाव ता.नेवासा येथे दिलेल्या भेटीप्रसंगी पंजाबराव डख(छायाचित्र : रमेश शिंदे,पाचेगाव)