नगर शहराला जोरदार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 02:31 PM2019-09-25T14:31:16+5:302019-09-25T14:31:50+5:30
नगर शहरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता.
अहमदनगर : नगर शहरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता.
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यामुळे उकाडाही जाणवत होता. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत काळे ढग दाटून आले होते. त्यानंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास धोधो पाऊस पडला. यामुळे शहरातील दिल्लीगेट, चितळीरोड, नालेगाव, सावेडी, प्रोफेसर चौकात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट झाला होता.
दरम्यान मंगळवारी रात्रीही सीना नदीच्या पाणलोटात उतर नक्षत्राचा जोरदार पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आला होता. नगर-कल्याण रोडवरील पुलावरील पाणी वहात असल्याने या महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा सीना नदीपात्रात पाण्याची भर पडली. सध्या नगर जिल्ह्यात रबी पिकाच्या पेरण्या सुरू आहेत. कांदा लागवड देखील सुरू आहे. हा पाऊस दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.