हेलिकॅप्टरमुळे राष्ट्रवादीने खासदारकीचे तिकिट कापले-सुजय विखे यांचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 04:09 PM2020-10-27T16:09:13+5:302020-10-27T16:09:53+5:30
अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तू आत्ताच हेलिकॅप्टरमधून फिरतोस. निवडून कसा येणार? असा प्रश्न उपस्थित करत खासदारकीचे तिकिट कापले, असा गौप्यस्फोट खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केला.
अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तू आत्ताच हेलिकॅप्टरमधून फिरतोस. निवडून कसा येणार? असा प्रश्न उपस्थित करत खासदारकीचे तिकिट कापले, असा गौप्यस्फोट खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केला.
जिल्हा बॅकेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खेळते भाडंवल म्हणून वाळकी, वडगाव तांदळी येथे सुमारे ११ कोटी रुपयांचा धनादेश खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, सरपंच स्वाती बोठे, दिलीप
भालसिंग, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, संतोष भापकर आदी उपस्थित होते. खासदार विखे यांनी जिल्ह्यातील विकासावरून विरोधी पक्षांच्या आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात सध्या टक्केवारीचा खेळ सुरू आहे. भाजपाच्या सत्ता काळात टक्केवारी घेतली गेली नाही.टक्केवारी आमच्या रक्तात नाही.
भाजपचे आमदार असताना मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने हे लोक करीत आहेत. नगर जिल्ह्याध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ६0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. या सरकारने काय दिले हे आधी सांगावे. हे सरकार फक्त केंद्राकडून जीएसटीचे पैसे मागत आहेत. आम्ही जीएसटीचे पैसे आणून देण्यासाठी मदत करतो. ते पैसे शेतकऱ्यांना देणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
आ. पाचपुते म्हणाले, जिल्हा बॅकही कारखानदारांची होती. ती आता माजीमंत्री कर्डिले यांनी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. सरसकट कर्जमाफी करा या घोषणेचा विसर आता मुख्यमंत्र्यांना पडला आहे का? असा सवाल पाचपुते यांनी उपस्थित केला.