रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त हेल्मेट रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:02+5:302021-02-10T04:20:02+5:30
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक खान, पोलीस निरीक्षक संजय सानप उपस्थित ...
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक खान, पोलीस निरीक्षक संजय सानप उपस्थित होते.
रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी दुचाकीस्वार, ड्राइव्हिंग स्कूलचे चालक, शहरातील काही वाहन चालक उपस्थित होते. डॉ. दीपाली काळे यांनी रस्ता सुरक्षा अभियाननिमित्त वाहतूक नियमांची उजळणी करण्याची आठवण करून दिली. आर. टी. खान यांनी सर्वोच्च न्यायालयाने अपघाताबाबत दिलेल्या आदेशांची माहिती दिली. प्रांताधिकारी पवार यांनी सर्वांना हेल्मेट व सीट बेल्ट वापराचे आवाहन केले. कोरोना संकटकाळात नागरिकांनी केलेल्या नियमांच्या पालनाप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळावेत, असे ते म्हणाले.
परिवहन कार्यालय ते महात्मा गांधी चौक, बेलापूर वेस, शिवाजी चौक, नोर्दन चौक, कॅनॉल रोड, सिद्धिविनायक मंदिर ते कामगार रुग्णालय अशी रॅली काढण्यात आली. बाजार समितीजवळ त्याची सांगता झाली.
दुचाकीवरील गणवेशधारी आरटीओचे अधिकारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सहायक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे यांनी नेतृत्व केले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे, निरीक्षक नीलेश डहाके उपस्थित होते.
....
फोटो : ०९ आरटीओ
ओळी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेट रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--------