केदारेश्वर कोविड सेंटरला मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:27+5:302021-05-28T04:16:27+5:30

केदारेश्वर साखर कारखाना अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ एप्रिलपासून कारखाना कार्यस्थळावर कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो ...

Help flow to Kedareshwar Kovid Center | केदारेश्वर कोविड सेंटरला मदतीचा ओघ

केदारेश्वर कोविड सेंटरला मदतीचा ओघ

केदारेश्वर साखर कारखाना अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ एप्रिलपासून कारखाना कार्यस्थळावर कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो जण कोरोनावर मात करून सुखरूप घरी सोडण्यात आले आहेत. कोविड सेंटरला अनेक दानशूरांनी मदत केली आहे. त्यामध्ये अशोक मोडके, ज्ञानेश्वर पावसे, परशुराम विखे, राजेंद्र पालवे, तांबे, सुनील फुंदे, प्रमोद विखे, संदीप बोडखे, प्रदीप देशमुख, बोधेगाव परिसरातील प्राथमिक शिक्षक संघटना, वकील कार्तिक कामाने, बाबा पठाण, शेवगाव तालुका वीज वितरणचे सहायक अभियंता मेहता, प्रकाश दहिफळे, माधवराव काटे, शहाजी जाधव, तुषार वैद्य, घुगे, बाबा मुंढे, श्रीमंत गव्हाणे, विठ्ठल अभंग, मयूर वैद्य, श्रीकिसन पालवे, सुरेशचंद्र होळकर, संदीप जाधव, राहुल पालवे आदींनी मदत केली. व्यंकटेश मल्टिस्टेट बँकेने रोख २१ हजार, एकबुर्जी तरुण मंडळाने ३०० अंडी पोहोच केली. या मदतीत शाकाहारी, मांसाहारी जेवण, किराणा सामान, अंडी, टरबूज, केळी, पेंडखजूर, पाणीबॉटल बॉक्स, दालबाटी जेवण, केशर आंबे रस, बिस्किटे तर वकील कार्तिक कमाने यांनी काजू, बदाम, किसमिसचे प्रत्येकी पावशेर प्रत्येक कोरोना रुग्णाला पाकीट दिले. केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी या कोविड सेंटरला दिलेल्या मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले. कारखान्याचे संचालक ऋषीकेश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरड, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, अंबादास दहिफळे यांच्या देखरेखीखाली सेंटरचे कामकाज सुरू आहे.

------

Web Title: Help flow to Kedareshwar Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.