अण्णासाहेब हजारे कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:35+5:302021-04-27T04:20:35+5:30

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांच्या माध्यमातून पद्मभूषण डॉ. ...

Help flows to Annasaheb Hazare Kovid Center | अण्णासाहेब हजारे कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू

अण्णासाहेब हजारे कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांच्या माध्यमातून पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड सेंटर सुरू होत आहे. यास परिसरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

देवदैठण परिसरात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णांना उपचार व योग्य आहार झटपट मिळावा, या सामाजिक बांधिलकीतून श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत हे कोविड सेंटर सुरू होत आहे.

यासाठी पुढीलप्रमाणे मदत जाहीर झाली आहे. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे-२५ खाटा, सॉलिसीटर ॲड. विकास पोटघन ५१ हजार रुपये, विद्याधाम प्रशालेची इ.१२ वी प्रथम बॅच-५१ हजार, सतीश सुभाष वाघमारे ५० गाद्या व उशी, संदीप सोनलकर १० हजाराचे अंडे, संदीप भवर, सतीश महादू कौठाळे प्रत्येकी ११ हजार रुपये, लक्ष्मीकांत दंडवते-५ फॅन, अमोल बाळासाहेब वाघमारे- पाणी बॉटल, संदीप काळे-५ हजार ५००, सर्जेराव कौठाळे-५ हजार, अमोल गायकवाड, किशोर गायकवाड प्रत्येकी १५००, अनिल जाधव रुग्णांसाठी दररोजचे चहापान तसेच गणेश बनकर व आप्पासाहेब गुंजाळ हे आचारी म्हणून सेवा देणार आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. बजरंग करंजुले, डॉ. विकास पाटील, डॉ. सूर्यकांत राऊत, डॉ. जालिंदर जासूद, डॉ. आरती पाटील हे खासगी डॉक्टर आरोग्य सेवा पुरवणार आहेत.

--

गावोगावचे हरिनाम सप्ताह, यात्रा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे त्यावर होणारी खर्चाची बचत झालेली रक्कम कोविड सेंटरमधील रुग्णांना अन्नदान व इतर मदत करावी.

-अतुल लोखंडे,

उद्योजक

Web Title: Help flows to Annasaheb Hazare Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.