मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांसाठी पाच दिवसांत मदत
By अरुण वाघमोडे | Published: March 12, 2023 05:40 PM2023-03-12T17:40:53+5:302023-03-12T17:44:39+5:30
ही मदत सर्व गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी गाव तेथे वैद्यकीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार असल्याचे शिवसना वैद्यकीय कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष राम राऊत यांनी रविवारी (दि.१२) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
अहमदनगर: शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अवघ्या पाच दिवसांत पैसे मिळवून दिले जातात. ही मदत सर्व गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी गाव तेथे वैद्यकीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार असल्याचे शिवसना वैद्यकीय कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष राम राऊत यांनी रविवारी (दि.१२) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
राऊत म्हणाले वैद्यकीय मतद कक्षाचे
राज्यातील २७ जिल्ह्यात कार्यालये आहेत. नगर शहरात दोन कार्यालये कार्यरत आहेत. जिल्ह्यासाठी सध्या ४० वैद्यकीय सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळात गावागावात वैद्यकीय सहाय्यक नियुक्त केले जाणार आहेत. वेगवेगळ्या प्रकाराच्या २० आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता
निधीतून ३ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी, टाटा ट्रस्ट, सिद्धीविनायक ट्रस्ट, एसटी, एस्सी समाजासाठी डॉ. बााबसाहेब आंबेडकर फंडातूनही मदत मिळून दिली जाते.