नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:53+5:302021-06-30T04:14:53+5:30
अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन, कांदा, पालेभाज्या, केळी, लिंबू, संत्री, आंबा आदींसह उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली. ...
अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन, कांदा, पालेभाज्या, केळी, लिंबू, संत्री, आंबा आदींसह उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली. राम शिंदे योन सोनेगाव येथे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सोनेगावचे सरपंच पद्माकर बिरंगळ, तरडगाव दौंडाची वाडीचे सरपंच डॉ.जयराम खोत, सातेफळचे सरपंच गणेश लटके, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, पंचायत समितीचे उपसभापती रवि सुरवसे, पंचायत समिती सदस्य डॉ.भगवान मुरुमकर, उपसरपंच विक्रम पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ.विशाल वायकर, अर्जुन वायकर, डॉ.आकाश ढोले, विशाल दौंड, चत्रभुज बोलभट, मदन पाटील, सुरेश कटके कृषी पर्यवेक्षक, तनुजा मोढळे कृषी सहायक, ज्ञानदीप घोडे कृषी सहायक, इराप्पा काळे आदी उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करून लवकर नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोनेगाव येथील शेतकरी अशोक बिरंगळ व ग्रामपंचायत सदस्य अश्रू खोटे यांनी दिला आहे.
------------------------------
अतिवृष्टीमुळे पेरलेले पीक वाहून गेले. फळबागा व घरांची पडझड होऊन नुकसान झाले. गेल्या तीन दिवसांपासून मात्र तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाला साधी भेट दिली नाही. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
- प्रा.राम शिंदे, माजी मंत्री
फोटो आहे.