शिवबा संघटनेची सामाजिक बांधीलकीतून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:02+5:302021-05-31T04:17:02+5:30
निघोज : कोरोना ही जागतिक महामारी आहे. शिवबा संघटनेने सामाजिक उपक्रमाबरोबर कर्तव्य भावनेतून पारनेर तालुक्यातील सर्व कोविड सेंटरला मदत ...
निघोज : कोरोना ही जागतिक महामारी आहे. शिवबा संघटनेने सामाजिक उपक्रमाबरोबर कर्तव्य भावनेतून पारनेर तालुक्यातील सर्व कोविड सेंटरला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिली.
शिवबा संघटनेने सामाजिक बांधीलकी म्हणून पारनेर तालुक्यातील निघोज येथील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर, पारनेर येथील डॉ. श्रीकांत पठारे संचलित आरोग्य मंदिर, भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर, टाकळी ढोकेश्वर येथील स्व. वसंतराव झावरे पाटील आरोग्य मंदिर व कान्हूर पठार येथील आझाद ठुबे संचलित आरोग्य मंदिर यांना मदत केली.
यावेळी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, स्वप्निल लामखडे, पत्रकार भास्कर कवाद, शिवबा पदाधिकारी निवड समितीप्रमुख राजू लाळगे, लहू गागरे, एकनाथ शेटे, शिवबा विद्यार्थी संघटना तालुकाप्रमुख मच्छिंद्र लाळगे, नागेश नरसाळे, गणेश नरसाळे, शिवबा अल्पसंख्याक तालुकाप्रमुख भैय्या पठाण, प्रीतेश पानमंद, शिवबा पारनेर शहरप्रमुख नीलेश दरेकर, गणेश चत्तर, अमोल ठुबे, यशोदीप रहाणे, अक्षय जाधव, अंकुश अडसूळ, यश अडसूळ आदी उपस्थित होते.
----
३० निघोज
निघोज येथील कोविड सेंटरला मदत देताना शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व इतर.