बांधकाम कामगारांना दहा हजारांची मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:23+5:302021-04-16T04:19:23+5:30
कोपरगाव : इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा ९ हजार कोटींचा हक्काचा निधी पडून आहे. त्या निधीतून कामगारांना १५०० ...
कोपरगाव : इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा ९ हजार कोटींचा हक्काचा निधी पडून आहे. त्या निधीतून कामगारांना १५०० ऐवजी प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कोपरगाव इमारत बांधकाम कामगार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर चोरगे यांनी गुरुवारी (दि. १५ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
चोरगे म्हणाले, सद्य:स्थितीत इमारत बांधकाम कामगार पूर्णत: समस्याग्रस्त झाला आहे. इमारत बांधकामाला लाॅकडाऊनमधून वगळले, पण आस्थापना बंद आहे. घराचे काम हे लोकांच्या संपर्कातील आहे. लाॅकडाऊनमधून वगळले असले तरी इमारत बांधकाम कामगारांना काम मिळत नाही. उपाशी मरणाची वेळ इमारत बांधकाम कामगारांवर आली आहे. सरकारने स्थापन केलेल्या इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे कामगारांच्या हक्काचा निधी पडून आहे. राज्य सरकारने १५०० रुपये मदत निधी जाहीर करणे, म्हणजे इमारत बांधकाम कामगारांची केलेली एक प्रकारची अवहेलनाच आहे.