ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून बिबट्या सुखरूप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:11+5:302021-08-20T04:26:11+5:30

बुधवारी मध्यरात्री शिकारीचे शोधात बाहेर पडलेला बिबट्या हा अंदाज न आल्याने येथील शेतकरी सुंदरबापू बाळासाहेब शिंदे यांच्या विहिरीमध्ये पडला ...

With the help of the villagers, the leopard came out of the well safely | ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून बिबट्या सुखरूप बाहेर

ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून बिबट्या सुखरूप बाहेर

बुधवारी मध्यरात्री शिकारीचे शोधात बाहेर पडलेला बिबट्या हा अंदाज न आल्याने येथील शेतकरी सुंदरबापू बाळासाहेब शिंदे यांच्या विहिरीमध्ये पडला होता. सकाळी शिदें कुटुंबीय उठले असता विहिरीलगत कुत्रे मोठ्याने भुंकतांना दिसल्याने सुंदरबापू शिंदे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एक बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ यांना फोन करुन विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती दिली. अशोक भुसाळ यांनी तत्काळ वनविभागाचे कर्मचारी अशोक गिते यांना घटनेची माहिती देऊन भुसाळ स्वतः घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल पी. जे. पुंड, वनरक्षक एस. एम. पारधी, पडवळे, वाहन चालक बोऱ्हाडे, अशोक गीते, डेंगळे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ, भगवान मैड, अतुल भुसाळ, शिवम शिंदे, संपत भुसाळ, सुनील शिखरे, अनिल सारबंदे, सतीष भुसाळ, राजेंद्र निर्मळ, गोवर्धन उंबरकर, गोकुळ खेमनर, सत्यम भुसाळ, शुभम भुसाळ, विशाल भुसाळ यांनी मदत केली. हा अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने देऊन त्याला पुढील कार्यवाहीसाठी निंबाळे रोपवाटिकेत हलवले आहे.

Web Title: With the help of the villagers, the leopard came out of the well safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.