फुलफगर परिवाराकडून कोविड सेंटरला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:35+5:302021-05-21T04:21:35+5:30

देवदैठण : शिरूर शहरातील प्रसिद्ध सराफ धरमचंद ज्वेलर्सचे मालक धरमचंद फुलफगर, त्यांचे सुपुत्र महेंद्र आणि देवेंद्र यांनी मातोश्री स्व. ...

A helping hand to the Kovid Center from the Fulfagger family | फुलफगर परिवाराकडून कोविड सेंटरला मदतीचा हात

फुलफगर परिवाराकडून कोविड सेंटरला मदतीचा हात

देवदैठण : शिरूर शहरातील प्रसिद्ध सराफ धरमचंद ज्वेलर्सचे मालक धरमचंद फुलफगर, त्यांचे सुपुत्र महेंद्र आणि देवेंद्र यांनी मातोश्री स्व. कमलाबाई भवरीलालजी फुलफगर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कोविड सेंटरला १ लाख ६१ हजार रुपयांची भरीव मदत केली आहे.

भाळवणी येथील आमदार नीलेश लंके संचलित शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी ५१ हजार रुपये, रावलक्ष्मी ट्रस्टला ५० हजार रुपये, निघोज येथील संदीप वराळ पाटील प्रतिष्ठान संचलित कोविड केंद्र व सी. टी. बोरा महाविद्यालय कोविड सेंटरसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये, देवदैठण येथील अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरासाठी ११ हजार रुपये, अशी १ लाख ६१ हजार रुपयाची मदत करून कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात दिला आहे. निर्वी येथील १५ गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा वाटप, तसेच विशेष मुलींच्या वसतिगृहातील कोरोनाबाधित मुलींना वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन दिले.

---

फोटो ओळी..

देवदैठण येथील कोविड सेंटरला धरमचंद फुलफगर यांच्या वतीने ११ हजार रुपये देण्यात आले.

Web Title: A helping hand to the Kovid Center from the Fulfagger family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.