साईसेवाचा कोविड सेंटरसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:21 AM2021-04-28T04:21:47+5:302021-04-28T04:21:47+5:30
ही मदत प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, बाबासाहेब भोस, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ...
ही मदत प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, बाबासाहेब भोस, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, सहकारी संस्था साहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर यांच्या हस्ते कोविड सेंटरला सुपुर्द करण्यात आली. कोळगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, घारगाव, लोणीव्यंकनाथ, मढेवडगाव, आढळगाव, श्रीगोंदा येथील कोविड सेंटरला ही मदत देण्यात आली.
प्रांताधिकारी स्वाती दाभाडे म्हणाल्या, कोरोना महामारीच्या काळात सामाजिक जाणिवेतून कोविड सेंटरला मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. इतर सहकारी संस्थांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
साईसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष माउली पाचपुते म्हणाले, कोविड सेंटरमधून गोरगरीब रुग्णांना जीवनदान मिळत आहे. म्हणून साईसेवा पतसंस्था संचालक मंडळाने कोविड सेंटरला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. या वेळी साईसेवाचे उपाध्यक्ष उत्तम मोरे, प्रा. मोहन धगाटे, राहुल जगताप, चंद्रशेखर काळे, राजेंद्र भोसले, गणेश डोईफोडे आदी उपस्थित होते.
........
शासकीय कोविड सेंटरसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याकडे मदत सुपुर्द करताना प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, बाबासाहेब भोस, साहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर, माउली पाचपुते.