अपघातग्रस्तांना मदत हाच खरा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:07+5:302021-03-04T04:37:07+5:30
केडगाव : वाढत्या लोकसंख्येसह महामार्गांचे जाळे वाढत आहे. वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला लवकर पोहचण्याची घाई असते. अनेक ...
केडगाव : वाढत्या लोकसंख्येसह महामार्गांचे जाळे वाढत आहे. वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला लवकर पोहचण्याची घाई असते. अनेक वेळा चूक नसताना अपघाताच्या घटना घडतात. अशावेळी अपघातग्रस्तांना मदतीची गरज असते. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. अपघातग्रस्तांना मदत हाच खरा मानवता धर्म असल्याचे प्रतिपादन महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी केले. महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ‘हायवे मृत्यूंजय दूत’ या योजनेचे उद्घाटन सोमवारी केडगाव येथील डॉन बास्को केंद्राच्या सभागृहात डॉ.विलास व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, डॉ.उमेश हांडे, पत्रकार मुरलीधर तांबडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल औटी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. व्यवहारे म्हणाले की, स्थानिक नागरिकांसह मृत्युंजय दूत असलेल्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. या काळात अपघातग्रस्तांची काळजी घ्यावी. रक्तस्त्राव कसा थांबवावा व नजीकच्या रुग्णालयात लवकरात लवकर कसे नेण्यात यावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
...
ज्यांना 'मृत्युंजय दूत' म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यांना आयकार्ड व ग्रुप वाइज स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य देण्याची तजवीज केली आहे.
- शशिकांत गिरी, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, केडगाव