गरज ओळखून केलेली मदत समाजहित जोपासणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:47+5:302021-06-01T04:15:47+5:30
नेवासा : गरज ओळखून केलेली मदत ही समाजहित जोपासणारी असते, असे प्रतिपादन उदयन गडाख यांनी केले. नेवासा फाटा येथील ...
नेवासा : गरज ओळखून केलेली मदत ही समाजहित जोपासणारी असते, असे प्रतिपादन उदयन गडाख यांनी केले.
नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला फर्निचर औषधे, कूलरचे संच भेट देण्यात आले. शंकरराव गडाख युवा मंच व मित्रमंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन बागवान यांनी प्रास्ताविक केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी नेवासा तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा सादर करत कोविड रुग्णसंख्या घटत असल्याचे सांगत लसीकरण मोहिमेत नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मार्फत उत्कृष्ट नियोजन केले असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, डॉ. शिवाजी शिंदे, मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, भाजपचे अनिल ताके, राजेंद्र उंदरे, राजेंद्र गुगळे, ॲड. अशोक कर्डक, आसिफ पठाण, सुनील धायजे, विनायक नळकांडे, अभय गुगळे, सुनील वाबळे, गणेश झगरे, बालू जिरे, सुनील जाधव, राजेंद्र लोखंडे उपस्थित होते.