... त्यामुळे भाजपाला पाठींबा दिला, राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:35 PM2018-12-29T14:35:00+5:302018-12-29T14:35:37+5:30

अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा देत जोर का झटका धीरे से असेच काहीतरी केले आहे

... hence the support of the BJP, NCP MLA Sangram jaGtap says in Ahmadnagar | ... त्यामुळे भाजपाला पाठींबा दिला, राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन 

... त्यामुळे भाजपाला पाठींबा दिला, राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन 

अहमदनगर - महापौर निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपाला पाठींबा दिल्यानंतर सर्वच स्तरातून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अवाक् झाले आहेत. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खुलासा केला आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नसून भाजपावर अंकुश ठेवण्यासाठी हा पाठींबा दिल्याचे जगताप यांनी म्हटलंय. 

अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा देत जोर का झटका धीरे से असेच काहीतरी केले आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून अहमदनगरमधील नगरसेवकांन नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी खुलासा केला. शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला. सध्या राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता असल्याने शहरविकासाकरीता निधी मिळण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मी आणि पक्षाच्या नगरसेवकांनी घेतल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असून भाजपाला आमचा बाहेरुन पाठींबा आहे. तसेच, पक्षश्रेष्ठींनी काढलेल्या नोटीसला आपण उत्तर देऊ, असेही जगताप यांनी स्पष्ट केलंय. तसेच छिंदम – बोराटे क्लिप प्रकरणी सखोल चौकशीही मागणी त्यांनी केली आहे. 
 

Web Title: ... hence the support of the BJP, NCP MLA Sangram jaGtap says in Ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.