"ऐ तिरंगे, तुझे कभी झुकने ना देंगे..."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:21+5:302021-06-25T04:16:21+5:30

अहमदनगर : ''अपने गुरूर को टूटने न देंगे, हिमालय का सिर कभी झुकने ना देंगे, मर मिटेंगे अपने वतन ...

"Hey tricolor, I will never let you down ..." | "ऐ तिरंगे, तुझे कभी झुकने ना देंगे..."

"ऐ तिरंगे, तुझे कभी झुकने ना देंगे..."

अहमदनगर : ''अपने गुरूर को टूटने न देंगे, हिमालय का सिर कभी झुकने ना देंगे, मर मिटेंगे अपने वतन के खातिर, लेकिन ऐ तिरंगे, तुझे कभी झुकने ना देंगे...'' अशा आत्मविश्वासाने आणि निष्ठेने एमआयआरसीच्या जवानांनी देशसेवेची शपथ घेतली.

मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमधे (एमआयआरसी) ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवारी जवानांनी देश रक्षणाची शपथ घेतली. एमआयआरसी येथील अखौरा ड्रिल मैदानात जवानांनी शानदार संचलन करीत उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यात आला.

भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील एमआयआरसी येथे लष्करात दाखल होणाऱ्या जवानांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या पाइप बँड व ब्रास बँड पथकाने सादर केलेल्या धूनवर जवान शपथग्रहण सोहळ्यासाठी मैदानावर आले. एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) मैदानावर आणताच सर्वांनी उभा राहून या ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली.

देशाचे रक्षण करताना कितीही अवघड परिस्थिती आली, तरी त्या परिस्थितीचा निर्भिडपणे सामना करतानाच देशाची एकता आणि अखंडता यांचे रक्षण करा. आपली वर्दी हा जवानांचा धर्म आहे. आपल्या रेजिमेंटचा विरता आणि विश्वास हा नारा नेहमी लक्षात ठेवा,'' असे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या.

..................

हेमंत बिशत यांना सुवर्णपदक

प्रशिक्षण काळात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्रूट हेमंत बिशत याला ''जनरल सुंदर जी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तर, रिक्रूट नीरज शर्मा याला ''जनरल के. एल. डिसूजा रजत पदक आणि रिक्रूट कविंदर पलायल याला ''पंकज जोशी कांस्यपदक'' देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: "Hey tricolor, I will never let you down ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.