नगर जिल्ह्यात कुरणमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण;  संगमनेर तालुक्यात ५३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:11 PM2020-07-08T14:11:29+5:302020-07-08T14:12:11+5:30

२५ जूनला संगमनेर तालुक्यातील कुरणमधील एका ८५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ही महिला या गावातील पहिली कोरोनाबाधित होती. त्यानंतर आतापर्यंत कुरणमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे सर्वांधिक रूग्ण आढळून आले आहेत. 

The highest number of corona patients in Kuran in Nagar district; In Sangamner taluka 53 people tested positive | नगर जिल्ह्यात कुरणमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण;  संगमनेर तालुक्यात ५३ जण पॉझिटिव्ह

नगर जिल्ह्यात कुरणमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण;  संगमनेर तालुक्यात ५३ जण पॉझिटिव्ह

संगमनेर : २५ जूनला संगमनेर तालुक्यातील कुरणमधील एका ८५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ही महिला या गावातील पहिली कोरोनाबाधित होती. त्यानंतर आतापर्यंत कुरणमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे सर्वांधिक रूग्ण आढळून आले आहेत. 

 संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना ६ ते १९ जुलै दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत.  

   नगर जिल्ह्यात सर्वाधिक१६५ रूग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. त्यापैकी १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १०० जण कोरोनामुक्त झाले असून ५३ जणांवर उपचार सुरू  आहेत. २५ जून ते ७ जुलै या काळात सर्वाधिक ४९ रूग्ण हे केवळ कुरणमध्ये आढळून आले. त्यापैकी ४२  जणांवर उपचार सुरू  असून सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. अजुनही ४० जणांचे अहवाल येणे बाकी आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ४२ जणांवर जिल्हा सामान्य व संगमनेरातील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: The highest number of corona patients in Kuran in Nagar district; In Sangamner taluka 53 people tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.