तिसगाव येथे खड्ड्यात हरवला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:10+5:302021-06-16T04:29:10+5:30
महामार्ग रुंदीकरणात दोन्ही बाजूला झालेल्या सिमेंट कॉंक्रिटीकरण गटारी केवळ शोभेची बाब ठरली असून रस्ता व गटार समांतर नसल्याने खड्ड्यांत ...
महामार्ग रुंदीकरणात दोन्ही बाजूला झालेल्या सिमेंट कॉंक्रिटीकरण गटारी केवळ शोभेची बाब ठरली असून रस्ता व गटार समांतर नसल्याने खड्ड्यांत मैला मिश्रित पाणी साचून राहत आहे. भरधाव चालणाऱ्या वाहनामुळे ते पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने वादही होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे व नंदकुमार लोखंडे यांनी याबाबत बांधकाम विभागाला लेखी तक्रारी केल्या. परंतु तात्पुरते स्वरूपात खड्डे बुजवले जाऊन मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे महिनाभरातच खड्ड्यांची मालिका जैसे थे होत आहे. दुभाजक म्हणून महामार्गाचे मध्यावर ठेवलेली खोलगट चारी दुसऱ्या पावसाळ्यातही तशीच असल्याने या त्रासात सर्वाधिक भर पडून अपघाताला आमंत्रण मिळत असल्याचे येथील रहिवासी शरद शेंदुरकर यांनी सांगितले. किमान व्यापारीपेठ व वर्दळीचे अंतरात तरी महामार्ग खड्डेमुक्त करावा. अशी मागणी सरपंच काशिनाथ लवांडे यांनी केली आहे.
फोटो आहे.