केशव माधव कोविड सेंटरला हिंद सेवा मंडळाची इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:50+5:302021-05-07T04:20:50+5:30
केशव माधव मोफत कोविड केअर सेंटरसाठी हिंद सेवा मंडळाच्या वतीने रामकरण सारडा विद्यार्थिगृहाची नूतन वास्तू मोफत देण्यात आली ...
केशव माधव मोफत कोविड केअर सेंटरसाठी हिंद सेवा मंडळाच्या वतीने रामकरण सारडा विद्यार्थिगृहाची नूतन वास्तू मोफत देण्यात आली आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, डॉ. रवींद्र साताळकर, संचालक मधुसूदन सारडा, डॉ. पारस कोठारी, ॲड. सुधीर झरकर, सेंटरचे प्रमुख राजेश परदेशी, रणजित श्रीगोड, श्रीकांत जोशी, संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. मनोहर देशपांडे, अशोक असेरी, सचिन मुळे, बंडू भोसले, गोवर्धन पांडुळे आदी उपस्थित होते.
यावेळी अजित बोरा म्हणाले, हिंद सेवा मंडळ शैक्षणिक कार्य करताना सामाजिक जाणीव ठेवून अनेक उपक्रमांना कायम मदत करत आहे. रामकरण सारडा विद्यार्थिगृहाचे अध्यक्ष श्यामसुंदर सारडा यांच्या प्रयत्नाने सेंटरला मोफत वास्तू दिली आहे. समन्वयक प्रा. मकरंद खेर व मधुसूदन सारडा यांच्या प्रयत्नाने महापालिकेचे सहकार्य या कोविड सेंटरला मिळाले आहे.