हिंद सेवा मंडळाचे सेवा कार्य अविरत सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:28+5:302021-05-12T04:20:28+5:30
नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत कोविड सेंटरला हिंद सेवा मंडळाच्या वतीने पंचवीस हजार रुपयांची मदत औषध खरेदीसाठी देण्यात ...
नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत कोविड सेंटरला हिंद सेवा मंडळाच्या वतीने पंचवीस हजार रुपयांची मदत औषध खरेदीसाठी देण्यात आली. यावेळी प्रा. मोडक बोलत होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. सचिन पऱ्हे यांनी ही मदत स्वीकारली. मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, उपकार्याध्यक्ष अशोक उपाध्ये, सहसचिव अनिल देशपांडे, नगरसेवक राजेंद्र पवार, अमोल कोलते, रणजीत श्रीगोड, दीपक कुऱ्हाडे, अधिक जोशी, कल्याण लकडे, ओंकार जोशी, बाळू गोर्डे आदी उपस्थित होते.
संजय जोशी म्हणाले, नगरपालिकेने गोरगरिबांसाठी शहरात कोविड सेंटर सुरू केले. त्याबद्दल नगराध्यक्ष आदिक यांना धन्यवाद द्यायला हवेत. पालिकेच्या वतीने येथे रुग्णांना विनामूल्य सेवा दिली जात आहे. येथील सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक यांचे काम खूप मोठे आहे.
कोविड महामारीपासून रक्षण आणि बचाव करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हिंद सेवा मंडळ सातत्याने आपले दायित्व पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही जोशी यांनी दिली.