संगमनेर महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:26 AM2021-09-16T04:26:34+5:302021-09-16T04:26:34+5:30
हिंदी भाषेवर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्येपासून तिला वाचवले पाहिजे. ज्यामुळे आपल्या हिंदी भाषेचे स्वतंत्र अस्तित्व, संस्कृती आणि इतिहास अबाधित राहील. ...
हिंदी भाषेवर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्येपासून तिला वाचवले पाहिजे. ज्यामुळे आपल्या हिंदी भाषेचे स्वतंत्र अस्तित्व, संस्कृती आणि इतिहास अबाधित राहील. आज शब्दांच्या संक्रमणाचा काळ आहे. हिंदी भाषेला रोजगाराच्या दृष्टीने सरळ व सोपे बनवणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनीच काम केले पाहिजे. शिक्षणाच्या प्रत्येक माध्यमात हिंदीचा समावेश आवश्यक आहे. हिंदी भाषेमध्ये शिक्षणाचा प्रचार-प्रसार जसा पाहिजे तसा झाला नाही. तसेच हिंदीचा विकास ज्याप्रमाणे होणे अपेक्षित होते तसे झाले नाही. तरीही आज अनुवाद, मीडिया, पटकथा लेखन व संवाद लेखन आदी क्षेत्रात हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी येत आहेत, असे डॉ. रोडे म्हणाले. प्रास्ताविक डॉ. चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ. प्रवीण केंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. डॉ. शरद शिरोळे यांनी आभार मानले.