हिंगणगाव पूल दोन महिन्यांपासून पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 03:01 PM2020-09-11T15:01:33+5:302020-09-11T15:02:26+5:30
निंबळक : गेल्या दोन महिन्यापासून हिंगणगाव नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यामुळे ग्रामस्थांना पुलावरून जाणारा मार्ग बंद झाला ...
निंबळक : गेल्या दोन महिन्यापासून हिंगणगाव नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यामुळे ग्रामस्थांना पुलावरून जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून हा रस्ता बंदच आहे.
हिंगणगाव ( ता. नगर ) नगर-कल्याण महामार्गापासून दिड कि.मी. अंतरावर आत आहे. येथील ग्रामस्थांना नगर येथे जाण्यासाठी या पुलावरून जावे लागते. हा पुल खोलगट आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुंनी बंधारे बांधण्यात आले आहेत. जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे येथील बंधारे तुडुंब भरले. हा पुल पुर्णपणे पाण्याखाली गेला. गेल्या दोन महिन्यापासून येथून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. हा पुल धोकादायक झाला आहे. हा रस्ता जिल्हा परिषद हद्दीमध्ये होता. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झालेला आहे. या पुलाचे काम होणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा पुल पाण्याखाली जात आहे. येथून नागरिकांना जखणगाव मार्गे नगर व इतर ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे.
हिंगणगाव फाटा ते हिंगणगाव पर्यतचा दिड किमीचा रस्ता नुकताच सार्वजानिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. या रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायतचे पत्र जोडून रस्त्याचे काम मार्गी लावू. ग्रामपंचायतने लवकर प्रस्ताव सादर करावा.
-श्रीपाद भागवत, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग